top of page
learn_tc_header_1x.png

Terms & Conditions

Digi Gold Terms & Conditions

वापराचे नियम

भाग - I

1.  प्रस्तावना

1.1हा दस्तऐवज माहिती तंत्रज्ञान कायद, 2000 आणि त्याअंतर्गत लागू असलेले नियम तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 ने सुधारित असल्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक नोंदींसाठी लागू असलेल्या विविध कायद्यांमधील तरतुदींप्रमाणे तयार करण्यात आलेली एक इलेक्ट्रॉनिक नोंद आहे. ही इलेक्ट्रॉनिक नोंद संगणक प्रणालीद्वारे तयार करण्यात आलेली असून त्याकरीता कोणत्याही शारीरिक अथवा डिजिटल हस्ताक्षराची आवश्यकता नाही.

1.2हा दस्तऐवज माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे) नियम, 2011 च्या नियम 3(1) च्या तरतुदींनुसार प्रकाशित करण्यात आलेला आहे, ज्याकरीता नियम आणि नियामके, गोपनीयता नियम आणि प्लॅटफॉर्मचा वापर तसेच प्रवेशसुलभतेचे नियम प्रकाशित करणे आवश्यक आहे.

1.3वापराचे नियमचे भाग 1 आणि भाग 2 हे एकत्रितपणे ‘नियम’ म्हणून ओळखले जातील आणि कायम एकत्रितपणे वाचले जातील.

2. व्याख्या

2.1.ह्या नियमांच्या उद्देशाकरता, जिथेही संदर्भाची आवश्यकता असेल तिथे संज्ञा:

2.1.1“ग्राहक” म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती जी प्रतिपक्ष म्हणून या नियमांप्रमाणे डिजिगोल्डकडून गोल्ड विकत घेण्याकरीत, वितरित (डिलिव्हरी) केलेले गोल्ड प्राप्त करण्याकरीता आणि/किंवा डिजिगोल्डला गोल्ड परत विकत देण्यासाठी ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करून व्यवहार करेल.

2.1.2“ग्राहक खाते” चा अर्थ असेल ह्या नियमांचे पालन करून तुमच्याद्वारे किंवा अन्य प्रकारे निर्माण करण्यात आलेले खाते.

2.1.3“ग्राहक खाते माहिती” चा अर्थ असेल ग्राहक खाते निर्माण करण्याच्या उद्देशाने तुमच्याद्वारे पुरवण्यात आलेली माहिती.

3.1.4“ग्राहक विनंती” चा अर्थ असेल ग्राहक सोन्याच्या संदर्भात तुमच्या द्वारे करण्यात आलेली वितरणाची (डिलिव्हरी) विनंती, विक्रीची विनंती अथवा अदलाबदल करण्याची विनंती.

3.1.5“अपरिहार्य आपत्ती” चा अर्थ असेल वितरकाच्या आणि/किंवा डिजिगोल्डच्या वाजवी नियंत्रणाच्या बाहेरची कोणतीही घटना आणि त्यात घातपात, आग, पूर, विस्फोट, देवाचे कृत्य, नागरी खळबळ, संप, बंद किंवा कोणत्याही प्रकारची औद्योगिक निष्क्रियता, सत्तेविरुद्ध उठाव, युद्ध, सरकारचे कृत्य, कंप्यूटर हॅकिंग, नागरी शांतताभंग, संगणक आधारसामग्री (कंप्यूटर डेटा) चा अनधिकृत वापर, व्हायरस हल्ले, सुरक्षा आणि कूटबद्धिकरणाचा भंग, तसेच वितरक आणि/किंवा डिजिगोल्ड्च्या नियंत्रणात नसलेली तसेच वितरक आणि/किंवा डिजिगोल्ड जिचे निराकरण करू शकणार नाही अशी कोणतीही घटना.

3.1.6“व्यक्ती” चा अर्थ असेल एखादी व्यक्ती, एक संस्था, एक भागीदारी, एक संयुक्त प्रकल्प, एक विश्वस्त मंडळ, एक अंतर्भूत करण्यात न आलेली संस्था आणि इतर कोणतीही कायदेशीर संस्था.

3.1.7“प्लॅटफॉर्म” चा अर्थ आणि त्यात समाविष्ट असेल ग्राहकाने कोणत्याही व्यवहाराकरीता, ज्यात प्लॅटफॉर्मद्वारे पुरवण्यात आलेल्या सर्व सामग्री, सेवा आणि तंत्रज्ञानाचा समावेश आहे, वापरतो ते ‘ट्रू बॅलन्स’ ह्या नावाचे किंवा त्या धर्तीचे मोबाइल अनुप्रयोग (अ‍ॅप्लिकेशन) आणि वेबसाइट.

3.1.8“हस्तांतरण” म्हणजे एका ग्राहक खात्यातून दुस ग्राहक खात्यात हस्तांतर करण्याची सुविधा.

विभाग 2.1 मध्ये व्याख्या करण्यात आलेल्या संज्ञांच्या व्यतिरिक्त, इथे वापरण्यात आलेल्या अतिरिक्त संज्ञांचा अर्थ हा इथून पुढे देण्यात आलेल्या त्यांच्याशी संबंधित असलेल्या विभागांमध्ये त्यांना घालून दिलेल्या अर्थानुसार असेल.

3.  डिजिगोल्ड द्वारे पुरवण्यात येत असलेल्या सेवांचे नियम व अटी

3.1.डिजिगोल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी अधिनियम, 2013 अंतर्गत अंतर्भूत करण्यात आलेली तसेच 1902, टॉवर बी, पेनिनसुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई, महाराष्ट्र 400013 येथे नोंदणीकृत कार्यालय असलेली कंपनी (“डिजिगोल्ड”) ग्राहकाला प्लॅटफॉर्मवर किंवा त्या द्वारे गोल्ड विकेल आणि सुरक्षित जमा ठेवणे/ वॉल्टमध्ये ठेवणे तसेच गोल्ड आणि संबंधित सेवा पोहचवणे/पूर्तता करणे या सेवा (“सेवा”) पुरवेल.

3.2.डिजिगोल्ड तर्फे खरेदी आणि/किंवा विक्रीकरीता देऊ करण्यात येत असलेले गोल्ड तिच्या (“सेफगोल्ड”) या ब्रँडनेम अंतर्गत आहे. सेवा डिजिगोल्ड द्वारे पुरवण्यात येत आहेत. बॅलन्सहीरो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (“वितरक”) फक्त आपल्या प्लॅटफॉर्मवर सेवा पुरवण्यास सुलभता प्रदान करीत आहे. वितरक हा पेमेंट सेवा पुरवण्यास तसेच सेवा संबंधित चौकशी करता ग्राहक सहाय्यता पुरविण्याची जबाबदारी धारण करीत आहे. सेवांसंदर्भात कोणताही आणि सर्व व्यवहार डिजिगोल्ड द्वारे मध्यस्थांच्या (म्हणजे सुरक्षा विश्वस्त आणि वॉल्ट कीपर) सहयोगाने पार पाडते, ज्यांच्यासह डिजिगोल्ड ने वेगळा अनुबंध केलेला आहे.

3.3.ग्राहकांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी सेवांचा वापर करण्यापूर्वी हे नियम काळजीपूर्वक वाचावे आणि समजून घ्यावेत.

3.4.डिजिगोल्ड आणि/किंवा वितरक ह्या प्लॅटफॉर्मच्या संदर्भाने कोणत्याही व्यक्तीशी, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे, केलेल्या कोणत्याही व्यवहारांवरील परताव्याची हमी देत नाही. ग्राहक (यापुढे “तुम्ही” आणि त्याला अनुसरून योग्य अर्थाप्रमाणे “तुमच्या” असे संबोधित केले जाईल) या वापराच्या नियमांप्रमाणे कोणतेही व्यवहार करण्याआधी योग्य आणि प्रभावी काळजी घेण्यास सर्वस्वी जबाबदार आहे. तुम्ही हेदेखील स्वीकार करता आणि सहमत होता की ह्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुमच्या कोणत्याही व्यवहारास किंवा इतर कोणत्या निर्णयांस डिजिगोल्ड आणि/किंवा वितरक तसेच त्यांचे अधिकारी, संचालक, कर्मचारी, एजंट आणि संबंधित व्यक्तींची कोणतीही जबाबदारी असणार नाही.

3.5.डिजिगोल्ड च्या सेवा ग्राहक खाते तयार होण्याच्या तारखेपासून सुरू होणाऱ्या कालावधीसाठी पुरविण्यात येतील

3.6.तुम्ही हे समजता आणि मान्य करता की ह्या सेवा या “आहे तशा” आणि “जशा उपलब्ध असतील तशा” ह्या आधारांवर पुरविण्यात येत आहेत. प्लॅटफॉर्ममध्ये काही त्रुटी किंवा अचूकतांचा अभाव असू शकतो ज्यामुळे तुम्ही प्लॅटफॉर्मला कनेक्ट कराल त्या डिव्हाइसमधील तसेच (सर्व्हर आणि संगणक ह्यांच्या समावेशासह पण त्यांच्यापुरताच मर्यादित न राहता) त्या डिव्हाइसेजशी कनेक्ट असलेल्या, परिघातील उपकरणांमधील आधारसामग्री (डेटा) आणि/किंवा माहिती निकामी होणे, भ्रष्ट होणे, नाहिशी होणे असे प्रकार घडू शकतात. तुमच्या डिव्हाइसच्या वापराकरीता किंवा कोणतेही उपकरण, सॉफ्टवेअर किंवा डेटाला होणाऱ्या नुकसानाबद्दल येणाऱ्या कोणत्याही खर्चासह परंतु त्यापुरता मर्यादित न राहता सर्व जोखमी तसेच खर्चांची जबाबदारी तुम्ही धारण करता.

4.  सुरक्षा विश्वस्त, मध्यस्थ आणि तिजोरी राखण व्यवस्था

4.1.मध्यस्थांची नियुक्ती

4.1.1.डिजिगोल्ड किंवा सुरक्षा विश्वस्त (जसे प्रकरण असेल त्याप्रमाणे) वेळोवेळी मध्यस्थ नियुक्त करू शकतील जे तुम्हाला सेवा पुरविण्यात डिजिगोल्ड ची सहाय्यता करतील (“मध्यस्थ”). “मध्यस्थ” ह्या संज्ञेचा अर्थ असेल सुरक्षा विश्वस्त, वॉल्ट कीपर आणि यांत तुम्ही ह्या नियमांना अनुसरून केलेल्या कोणतीही ग्राहक विनंतीची पूर्तता होईपर्यंत डिजिगोल्ड किंवा सुरक्षा मध्यस्थांनी (जसे प्रकरण असेल त्याप्रमाणे) नियुक्त केलेल्या कोणत्याही आणि सर्व व्यक्त्तींचा समावेश असेल. तुम्ही याद्वारे, तुमच्यासाठी आणि तुमच्या वतीने, डिजिगोल्ड किंवा सुरक्षा विश्वस्तांच्या द्वारे (जसे प्रकरण असेल त्याप्रमाणे) अशा नियुक्तीस सहमती देत आहात.

4.1.2.तुम्ही हे मान्य करता आणि समजता की तुमच्या ग्राहक ऑर्डर्स/ग्राहक विनंती या नियमांना अनुसरून योग्य प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत याची खातरजमा करण्यासाठी हे मध्यस्थ नेमण्यात आले आहेत. तुम्ही हे देखील मान्य करता की ह्या मध्यस्थांच्या नेमणुकीकरीता आणि त्यासंदर्भातील सेवांकरीता काही विशिष्ट मोबदला द्यावा लागेल, जो ह्या नियमांमध्ये अन्यथा नमूद केला नसल्यास तुमच्या वतीने डिजिगोल्ड वाहेल.

4.2.सुरक्षा विश्वस्तांची नियुक्ती

4.2.1.तुम्ही याद्वारे मान्य करता आणि सहमत होता की तुमच्या ग्राहक ऑर्डर्स/ग्राहक विनंत्या सर्व परिस्थितींमध्ये पूर्ण केल्या जाव्यात याची खातरजमा करण्याकरीता ग्राहक सोन्यावर पहिले आणि अनन्य असा एक ताबा तारणाच्या द्वारे आयडीबीआय विश्वस्त सेवा मर्यादित किंवा कोणत्याही उत्तराधिकारी व्यक्तीच्या (“सुरक्षा विश्वस्त”) पक्षात तयार केला जाईल.

4.2.2.हे नियम स्वीकारून, तुम्ही यासह सुरक्षा विश्वस्ताच्या व्यवस्थेसाठी (अर्थात् एक सुरक्षा विश्वस्त अनुबंधाच्या) तसेच तारण किंवा तत्सम (“सुरक्षा विश्वस्त अनुबंध”) द्वारे ग्राहक गोल्ड ताबा तयार करण्याकरीता आवश्यक असलेल्या अटींना स्वीकारत आहात. “मी स्वीकारत आहे” या बटणावर क्लिक करून तुम्ही सुरक्षा विश्वस्त अनुबंध (अशा तारखेला) अशा प्रकारे स्वीकारत आहात जसे की तुम्ही त्याकरीता मूळ पक्ष म्हणून नामित आहात आणि अशा सुरक्षा विश्वस्त अनुबंधांपैकी प्रत्येक अनुबंध अंमलात आणला आहे; आणि सुरक्षा विश्वस्त अनुबंधाच्या सर्व नियम आणि अटींना बांधील असाल.

4.2.3.जर तुमच्या कोणत्याही ग्राहक ऑर्डर/ग्राहक विनंतीच्या प्रत्यक्ष वितरणापर्यंत कोणत्याही मध्यस्थास किंवा अन्यथा कुणास कोणतेही खर्च किंवा शुल्क कोणत्याही कारणास्तव देणे थकबाकी असेल, जिथे डिजिगोल्ड हे खर्च किंवा शुल्क देण्यास असमर्थ असेल अशा परिस्थितीसह, आणि त्यायोगे तुमच्या ग्राहक ऑर्डर/ग्राहक विनंतींची पूर्तता प्रतिकूलपणे प्रभावित होत असेल अथवा धोक्यात येत असेल तर सुरक्षा विश्वस्तांना ग्राहक सोन्यातील काही भाग विकण्यास आणि त्यातून सुरक्षा विश्वस्त अनुबंधासह वाचण्यात आलेल्या ह्या नियमांना अनुसरून असे थकबाकी खर्च फेडण्याचे अधिकार प्राप्त असतील. प्रस्तुत शुल्क फेडल्यानंतर तुम्हाला देय असलेली रक्कम आणि/किंवा वितरीत करण्याचे सोन्याबाबत (जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे) निर्णय हा सुरक्षा विश्वस्त अनुबंधासह वाचण्यात आलेल्या ह्या नियमांनुसार करण्यात येईल.

4.2.4.ह्या नियमांच्या योगे, तुम्ही सुरक्षा विश्वस्तांना तुमच्या वतीने तुमचे हितसंबंध पुरेशा रीतीने सुरक्षित ठेवण्याची खातरजमा करण्यास अधिकृत करत आहात.

4.3.गोल्ड सुरक्षित ठेवणे/वॉल्ट करणे

4.3.1.ग्राहक विनंतीशी सुसंगत असे तुम्ही विकत घेतलेले गोल्ड हे तुमच्या वतीने एका विश्वस्ताकडे एका वॉल्टमध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात येईल (“वॉल्ट कीपर”).

4.3.2.तुम्ही ह्याद्वारे अधिकृत करता: (i) विकत घेतलेले गोल्ड सुरक्षित ठेवण्यासाठी अशा वॉल्ट कीपरची नियुक्ती; आणि (ii) की डिजिगोल्ड तुम्ही विकत घेतलेले गोल्ड, लगड, नाणी किंवा दागिने यांसह परंतु यांपुरता मर्यादित न राहता (जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे), तुमच्या वतीने एका सुरक्षित वॉल्टमध्ये ठेवेल (“ग्राहक गोल्ड”). हे ह्याद्वारे स्पष्ट करण्यात येते की तुमच्या वतीने ग्राहक गोल्ड असा संबंधित भाग हा तुमच्या वतीने वॉल्ट कीपरकडे वॉल्टमध्ये ठेवण्यात आल्यावर किंवा डिजिगोल्ड कडून लागू असलेल्या कायद्यांच्या अधीन राहून ह्या नियमांच्या अनुसार अंतिम इन्व्हॉइस जारी केल्यानंतर ग्राहक विनंतीशी सुसंगत अशी तुमची गोल्ड खरेदी ही पूर्ण झाल्याचे समजण्यात येईल आणि त्यासंदर्भातील मालकीहक्क सोपवण्यात आल्याचे समजण्यात येईल.

4.3.3.वॉल्टमध्ये ठेवण्यात आलेले ग्राहक गोल्ड पुरेशे सुरक्षित आहेत ह्याची खातरजमा करण्यासाठी आवश्यक सुरक्षा विमा काढला/काढले आहेत, जिथे गोल्ड सुरक्षित ठेवण्याच्या विम्याचा खर्च वॉल्ट कीपरने उचललेला आहे. वॉल्टमध्ये ठेवण्यात आलेल्या ग्राहक सोन्याच्या कोणत्याही नुकसान किंवा हानीसाठी, अशा सुरक्षा विम्याच्या/विम्यांच्या अनुसार तुम्ही ह्याशिवाय विमा पॉलिसी/पॉलिसींच्या अंतर्गत तुमचे हितैशी म्हणून कार्य करण्यास आणि तुमचे हितसंबंध जपण्यासाठी सर्व आवश्यक उपाय योजण्यास सुरक्षा विश्वस्तांना अधिकृत करत आहात.

4.3.4.वॉल्ट कीपरने सर्व आवश्यक विमा पॉलिसी काढली/काढल्या असल्या तरी अशा विमा पॉलिसी/पॉलिसींमध्ये समाविष्ट नसलेली अनुचित घटना घडल्यास ग्राहक गोल्ड हे धोक्यात येऊ शकते. वॉल्ट कीपरने काढलेली/काढलेल्या पॉलिसी जागतिक उद्योग पद्धतींच्या अनुसार आहेत आणि त्यात आग, वीज, चोरी, वादळ, भूकंप, पूर, इत्यादी कारणांनी होणारे नुकसान समाविष्ट असते पण त्यात युद्ध, क्रांती, युद्धात टाकून देण्यात आलेली शस्त्रे, आण्विक उत्सर्जन इत्यादी घटनांमुळे होणारे नुकसान समाविष्ट केलेले नसते.

5. गोल्ड साठवून ठेवणे

डिजिगोल्डने प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी निर्दिष्ट केलेल्या कमाल कालावधीत तुम्ही तुमच्या ग्राहक सोन्याची पोहोच (डिलिव्हरी) घेणे आवश्यक आहे (“कमाल साठवण कालावधी”). तुम्हाला ते वितरीत केले जाण्यासाठी तुम्ही वितरकाने आणि/किंवा डिजिगोल्डने प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे तुमचा वैध पत्ता आणि/किंवा कोणतेही इतर दस्तऐवज/माहिती/बायोमेट्रिक ओळख पुरविणे आवश्यक आहे. तुम्ही असा पत्ता कमाल साठवण कालावधीच्या दरम्यान कधीही देऊ शकता. कमाल साठवण कालावधीत तुमच्याकडून वैध पत्ता पुरविला न गेल्याची घटना घडल्यास वितरक आणि/किंवा डिजिगोल्ड कमाल साठवण कालावधीची मुदत संपण्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या कालावधीपर्यंत (अशा कालावधीला “सवलतीची मुदत” असे संबोधण्यात येईल) तुम्ही पुरविलेल्या माहितीचा उपयोग करून एकतर (i) संबंधित गोल्ड तुम्हाला पोहचवण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेला पत्ता किंवा (ii) गोल्ड विकून मिळालेली रक्कम जमा करण्यासाठी तुमच्या बँक खात्याची माहिती मिळवण्यासाठी किमान एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतील. वितरक आणि/किंवा डिजिगोल्ड लागू असलेल्या सवलतीच्या मुदतीत तुम्ही पुरविलेलल्या माहितीचा उपयोग करून तुमच्याशी संपर्क साधू न शकल्यास किंवा ह्या सवलतीच्या मुदतीत जर तुम्ही:

(a)(अशा सोन्याची पोहोच घेण्यासाठी तुम्ही पत्ता न पुरविल्याच्या बाबीसह) कोणत्याही कारणास्तव तुम्ही संबंधित सोन्याची पोहोच घेतली नाही; किंवा

(b)अशा ग्राहक सोन्याच्या विक्रीतून मिळालेली रक्कम जमा करण्यासाठी एका वैध बँक खात्याचे तपशील पुरविले नाहीत;

तर संबंधित ग्राहक सोन्याची लागू असलेली सवलत मुदत संपल्यावर डिजिगोल्ड असे ग्राहक गोल्ड प्लॅटफॉर्मवर दर्शवलेल्या ग्राहकाकडून गोल्ड विकत घेण्याच्या तत्कालीन खरेदी किंमतीप्रमाणे लागू असलेल्या खरेदी किंमतीने विकत घेईल. फ्री स्टोरेज कालावधीनंतर अशा सोन्याच्या साठवणुकीसाठी डिजीगॉल्डला देय असलेली कोणतीही रक्कम वजा केल्यावर अशा विक्रीतून (“अंतिम विक्री उत्पन्न”) मिळालेल्या रकमेची रक्कम सिक्युरिटी ट्रस्टीद्वारे चालवलेल्या विना-बँक खात्यात जमा केली जाईल. अशा बँक खात्यावर कोण एकमेव स्वाक्षरीकर्ता असेल.लागू असलेली सवलतीची मुदत संपण्याच्या तारखेपासून 3 वर्षांच्या कालावधीत (ही कालावधी “अंतिम दावा मुदत” असेल) तुम्ही वितरक, डिजिगोल्ड किंवा सुरक्षा विश्वस्ताला तुम्ही अंतिम विक्रीच्या रकमेवर दावा करत आहात असे सूचित केले तर सुरक्षा विश्वस्त तुम्ही ह्या उद्देशाकरीता सूचित केल्याप्रमाणे अशा बँक खात्यात विक्रीतून आलेली रक्कम हस्तांतरित करण्याच्या योग्य त्या सूचना जारी करेल. अंतिम विक्रीच्या रकमेवर दावा करण्यासाठी तुम्हाला एका वैध बँकेचे तपशील पुरवावे लागतील आणि अंतिम विक्री रक्कम अशा तपशीलांच्या अभावात हस्तांतरित केली जाणार नाही, ह्याची कृपया नोंद घ्या. कोणत्याही वेळी अंतिम विक्री रक्कम ही तुम्हाला रोख स्वरुपात देण्यात येणार नाही. तुम्ही अंतिम दावा मुदतीत तुमच्या अंतिम विक्री रकमेवर दावा न केल्यास अंतिम विक्री रक्कम ही पंतप्रधान मदत किंवा अशा उद्देशाने सवलत मुदत संपण्याच्या आधी तुम्ही नेमून दिलेल्या इतर कोणत्या निधीस हस्तांतरित करण्यात येईल.

6. अपरिहार्य आपत्ती

कामगार विवाद, संप, देवाचे कृत्य, पूर, वीज, तीव्र हवामान, सामग्रीचा तुटवडा, पुरवठा नियंत्रण, कोणत्याही व्हायरसचा प्रादुर्भाव, ट्रॉजन किंवा इतर कोणते विघटनकारी तंत्र, हॅकिंग किंवा प्लॅटफॉर्मचा बेकायदेशीर वापर, उपयोगिता किंवा दळणवळणातील कमी, भूकंप, युद्ध, क्रांती, दहशतवादाची कृत्ये, नागरी शांतताभंग, सार्वजनिक शत्रूंची कृत्ये, नाकेबंदी, व्यापारबंदी, किंवा कोणत्याही सरकारचा अथवा कोणत्याही न्याय प्राधिकरणाचा अथवा कोणत्याही अशा सरकारच्या प्रतिनिधीचा कायदेशीर प्रभाव असणारा कायदा,आदेश, घोषणा, नियमन, मागणी अथवा आवश्यकता, किंवा प्लॅटफॉर्मवर प्रवेश-सुलभता मिळवून देत असलेल्या कोणत्याही डिव्हाइसने काम न करणे, किंवा इतर कोणतेही ह्या विभागात संदर्भित केलेल्या कृत्यांशी साधर्म्य असलेल्या किंवा नसलेल्या अशा, वितरक आणि/किंवा डिजिगोल्डच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या आणि वाजवी सावधानता बाळगून रोखता आले नसते अशा कृत्यामुळे जर ह्या नियमांच्या अंतर्गत असलेले कार्य प्रतिबंधित, मर्यादित, विलंबित किंवा हस्तक्षेपित झाले तर वितरक आणि/किंवा डिजिगोल्डला अशा अपरिहार्य नैसर्गिक अथवा अन्यथा आपत्तीच्या कालावधीपुरता आणि त्या दरम्यानच्या कार्यनिष्पादनाच्या जबाबदारीतून मुक्त असतील.

7. डिजिगोल्डकडून सेवांची समाप्ती

7.1डिजिगोल्ड, सर्वस्वी आपल्या विवेकबुद्धीनुसार, ह्या नियमांपैकी कोणत्याही नियमाचा भंग होणे किंवा ग्राहक ईओडीच्या परिस्थितीत किंवा गोपनीयता धोरण यांसह कोणत्याही कोणत्याही वेळी प्लॅटफॉर्मवरील प्रवेश बदलू शकते, स्थगित करू शकते किंवा संपवू शकते किंवा प्लॅटफॉर्मवरील सर्व अथवा काही भागांमध्ये प्रवेश करण्याची तुमची सुविधा किंवा कोणत्याही सेवांची तुम्हाला असलेली सुविधा बदलू शकते, स्थगित करू शकते किंवा संपवू शकते. “ग्राहक ईओडी” चा अर्थ असेल सुरक्षा विश्वस्त अनुबंधांतर्गत ग्राहकाने त्याच्या/तिच्या सुरक्षा विश्वस्तांप्रती असलेल्या दायित्वाच्या पालनात कसूर करणे, तथापि तुम्ही तुम्ही सुरक्षा विश्वस्तांच्या पक्षात केलेल्या तारणाच्या अंमलबजावणीसाठी सुरक्षा विश्वस्तांनी आधी सदर प्रकरणात न्यायाधिकार असलेल्याएका सक्षम न्यायिक किंवा कायदेशीर प्राधिकरणाकडून योग्य आदेश/निर्देश मिळवणे आवश्यक आहे.

7.2ह्याखेरीज, खालील परिस्थितींमध्ये हे नियम संपुष्टात येतील:

7.2.1.जर डिजिगोल्ड कर्जबाजारी झाली किंवा दिवाळखोर म्हणून जाहीर करण्यात आली तर;

7.2.2.जर डिजिगोल्डने आपला व्यवसाय करणे बंद केले किंवा सुरक्षा विश्वस्तांना आपण आपला व्यवसाय बंद करणार असल्याचा हेतू कळवला तर;

7.2.3.जर डिजिगोल्डने सुरक्षाविश्वस्त अनुबंधाच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही नियम आणि अटींचे उल्लंघन केले किंवा सुरक्षा विश्वस्तांनी तसे करण्यास सांगूनही डिजिगोल्डने अशा प्रकारच्या उल्लंघनावर योग्य ती उपाययोजना 60 दिवसांत केली नाही तर;

7.2.4.डिजिगोल्डने पेमेंट स्थगित करणे, व्यवसाय गुंडाळणे, विलयन, प्रशासन, (स्वेच्छिक व्यवस्था, व्यवस्थेची योजना किंवा इतर कशा अंतर्गत) हंगामी पर्यवेक्षण किंवा पुनर्संघटन किंवा पुनर्रचना अशा कोणत्याही बाबतीत (तृतीय पक्षसंस्थात्मक कारवाईखेरीज) कोणतीही संस्थात्मक (कॉर्पोरेट) कारवाई किंवा इतर कोणत्या प्रकारची कारवाई अथवा इतर उपाययोजना करण्यात आली तर;

7.2.5.डिजिगोल्डने कोणत्याही कर्जबाजारीपणा, दिवाळखोरी, व्यवसाय गुंडाळणे किंवा इतर कोणत्याही सध्या लागू असलेल्या किंवा ह्यानंतर अंमलात येत असलेल्या कायद्यानुसार स्वेच्छिक कारवाईला सुरुवात केली, किंवा कोणत्याही ग्रहणकर्ता (रिसीव्हर), परिसमापक (लिक्विडेटर), अभिहस्तांकिती अर्थात् असाइनी (किंवा तत्सम अधिकारी) यांच्या नेमणुकीला किंवा डिजिगोल्डच्या संपूर्ण मालमत्तेचा किंवा मालमत्तेच्या मोठ्या भागावर अशा अधिकारीने ताबा घेण्याला सहमती दर्शवली किंवा डिजिगोल्डचे पुनर्संघटन, समापन किंवा विलयन यांपैकी काहीही करण्याच्या दिशेने पावले उचलली तर;

7.2.6.लागू कायद्याप्रमाणे डिजिगोल्डच्या व्यवसाय गुंडाळण्यासंबंधी, दिवाळखोरीसंबंधी किंवा विलयन करण्यासंबंधी आदेश निघाल्यास किंवा संस्थात्मक कर्जबाजारी प्रक्रियेच्या निराकरणाच्या प्रक्रियेसंबंधी कोणताही अर्ज दाखल करून घेण्यात आला तर;

7.2.7.कोणत्याही बोजाने कायदेशीररीत्या ताबा घेतला, किंवा कोणत्याही परिसमापकाने, न्यायिक विश्वस्ताने, ग्रहणकर्त्याने, प्रशासकीय ग्रहणकर्त्याने किंवा विश्वस्ताने किंवा कोणत्याही सदृश अधिकाऱ्याची डिजिगोल्डच्या संपूर्ण मालमत्तेचा अथवा तिच्या मोठ्या भागाचा ताबा घेण्यासाठी नेमणूक करण्यात आली किंवा डिजिगोल्डची संपत्ती अथवा मालमत्तेवर टाच येणे, कच्ची जप्ती, अटकावणी किंवा (सदृश प्रक्रियेची) अंमलबजावणी आकारण्यात आली, किंवा सक्ती करण्यात आली किंवा जारी करण्यात आली, अथवा परिसमापन किंवा विलयन किंवा तत्सम पुनर्संघटनाच्या दिशेने डिजिटलच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली किंवा सक्ती करण्यात आली तर;

7.2.8.डिजिगोल्डच्या संबंधात एका हंगामी परिसमापकाची नियुक्ती करण्यात आली, किंवा डिजिगोल्डच्या संबंधात किंवा तिच्या कोणत्याही संपत्तीच्या संदर्भात किंवा सादृश घटनेच्या परिस्थितीत ग्रहणकर्ता आणि व्यवस्थापक, विश्वस्त किंवा तत्सम अधिकारी नियुक्त करण्यात आला तर.

7.3विभाग 7.2 मध्ये संदर्भित करण्यात आलेली कोणतीही घटना घडल्या, आणि जिथे तुम्हाला तुमचे ग्राहक गोल्ड वितरीत करण्यासाठीची किंमत आणि खर्च देण्याकरीता डिजिगोल्डकडे अपुरा निधी असल्यास, अशा प्रसंगी अशा किमती आणि खर्च भागवण्यासाठी आवश्यक किंवा गरजेचे वाटेल असा ग्राहक गोल्ड कोणताही भाग विकण्यासाठी तुम्ही याद्वारे सुरक्षा विश्वस्ताला अधिकृत करीत आहात.

7.4सुरक्षा विश्वस्त अनुबंधाला अनुसरून, डिजिगोल्डने ग्राहकांच्या हितासाठी सुरक्षा विश्वस्तांच्या पक्षात तारणाच्या योगे एक ताबा तयार केला आहे खालील बाबतीत लागू होईल: (अ) संग्रहण खात्यात वेळोवेळी जमा झालेले पैसे; आणि (b) डिजिगोल्डने वेळोवेळी विकत घेतलेले आणि वॉल्ट कीपरच्या ताब्यात असलेले किंवा मार्गस्थ असलेले असे गोल्ड जे डिजिगोल्डची मालमत्ता आहे: (एकत्रितपणे “सुरक्षा”). 7.1 आणि 7.2 मध्ये तपशीलवार दिलेली कोणतीही घटना घडल्यास सुरक्षा विश्वस्ताने सुरक्षा विश्वस्त अनुबंधांतर्गत खालील उपाय योजायचे आहेत: (i) सर्व थकबाकी रकमा ह्या देय असून त्या ह्यापुढे सुरक्षा विश्वस्ताला देय आहेत असे घोषित करणे; आणि (ii) सुरक्षेचा अधिकार आणि/किंवा ताबा घेणे, हस्तगत करणे, वसूली करणे, प्राप्त करणे आणि काढून टाकणे तसेच डिजिगोल्डकडून ग्राहकांप्रती असलेली देणी देण्यासाठी त्या सुरक्षेचा वापर करणे. मात्र तुम्ही हे स्वच्छपणे समजता आणि स्वीकारता की सुरक्षेची कोणतीही अंमलबजावणी ही नेहमी लागू असलेल्या कायद्याप्रमाणे पार पाडण्यात आली पाहिजे आणि कायद्याच्या अधीन असली पाहिजे आणि म्हणून:

(i)असे कोणतेही वितरण करण्यासाठी लागणारा वेळ हा अचूकपणे वर्तवता येणे शक्य नसते; आणि/किंवा

(ii)अशा वितरणातून तुम्ही प्राप्त केलेली रक्कम ही डिजिगोल्डचे तुम्हाला असलेले देणे पूर्णपणे फेडण्यासाठी पुरेसे नसण्याची शक्यता आहे;

आणि परिणामी, वरील संदर्भात कोणत्याही उत्तरदायित्वाची भर ही सुरक्षा विश्वस्तांवर पडणार नाही.

8. डिजिगोल्डकडून सेवांची समाप्ती होण्याचे परिणाम

8.1.कोणत्याही कारणास्तव अशा प्रकारची सेवा-समाप्ती घडून आल्यास, सुरक्षा विश्वस्त अनुबंधाच्या अधीन राहून:

8.1.1.1 (एक) ग्रामपेक्षा कमी असलेल्या गोल्ड धारणाच्या क्षुल्लक राशी ह्या विकता येतील आणि त्यातून मिळालेल्या रोख रकमा ह्या, मध्यस्थांच्या नेमणुकांशी संबंधित असलेले शुल्क (मध्यस्थ आणि इतर खिशातून झालेले खर्च, राखण शुल्क, टाकसाळ आणि डिलिव्हरी शुल्क यांच्यासह पण यांच्यापुरते मर्यादित न राहता) (“शुल्क”) वगळले गेल्यानंतर, थेट तुमच्या बँक खात्यात पाठवल्या जातील.

8.1.2.सोन्याच्या मोठ्या राशींकरता, सुरक्षा विश्वस्ताला (तुम्ही सर्व शुल्कांपैकी आधीच पेमेंट न केलेल्या रकमेच्या मर्यादेत) तुमच्या सोन्यापैकी काही भाग विकून सर्व मध्यस्थांचे शुल्क फेडण्याचे अधिकार देण्यात यावेत. गोल्ड शिल्लक भाग या नियमांना अनुसरून, सर्व वगळण्यात आलेले खर्च तसेच तुम्हाला प्राप्त करण्याचा अधिकार असलेला गोल्ड हिस्सा, यांच्या तपशीलांसह तुम्हाला पोहचवण्यात येईल.

8.2.तुम्ही हे मान्य करता की प्लॅटफॉर्म आणि सेवांची तुमची प्रवेश सुलभता कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय प्रभावित होऊ शकते आणि ग्राहक खाते तत्काळ निष्क्रिय केले किंवा हटवले जाऊ शकते तसेच सर्व संबंधित माहिती आणि/किंवा ग्राहक खाते, प्लॅटफॉर्म किंवा सेवांची भविष्यातील प्रवेश सुलभता प्रतिबंधित केली जाऊ शकते. याशिवाय, तुम्ही सहमत होता की कोणत्याही तृतीय पक्षाने सेवा खंडित अथवा समाप्त केल्यास वितरक आणि/किंवा डिजिगोल्ड त्यास जबाबदार असणार नाही.

8.3.सेवा-समाप्तीनंतर प्लॅटफॉर्मवरील तुमच्या कोणत्याही सामग्रीपर्यंत तुम्हाला पोहोचता येणार नाही. एकदा तुमचे खाते संपुष्टात आल्यानंतर तुम्हाला ही माहिती पुन्हा मिळवता येणार नाही.

8.4.हमी देतानाचे अस्वीकरण, उत्तरदायित्वामधील सीमांकन, उत्तरदायित्व आणि नियामक कायद्यामधील तरतुदी ह्या या नियमांच्या समाप्तीनंतरदेखील कायम राहतील.

9. नियामक कायदा आणि विवाद निराकरण

हे नियम भारतीय कायद्यांच्या द्वारे नियंत्रित आणि परिभाषित केले जातील तसेच त्यांच्या अनुसार त्यांचा अन्वयार्थ लावला जाईल. या नियमांमधून उद्भवलेले कोणतेही विवादांवर हे मुंबईच्या न्यायालयांचा न्यायाधिकार असेल. या नियमांमधून कोणताही विवाद उद्भवल्यास त्याचे निराकरण दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे नियुक्त केलेल्या आणि लवाद आणि सलोखा कायदा, 1996 च्या अधीन असलेल्या एका एकमेव लवादीमार्फत एका बंधनकारक लवादाच्या माध्यमातून केले जाईल. लवादाचे स्थान मुंबई, महाराष्ट्र, भारत हे असेल.

भाग - II

10. ग्राहक खाते तयार करणे आणि नोंदणीची बंधने

10.1.ह्या सेवांचा लाभ घेण्यापूर्वी ग्राहकाने वेळोवेळी सांगितली गेल्याप्रमाणे नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ग्राहकाने ग्राहक खाते उघडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. वितरक आणि/किंवा डिजिगोल्ड ह्यांना ग्राहकाने केवायसी उद्देशांसाठी प्लॅटफॉर्मला दिलेली संबद्ध माहिती गोळा करण्याचे आणि संग्रहित करण्याचे अधिकार आहेत. डिजिगोल्ड आणि/किंवा वितरकाला जसे आणि जेव्हा आवश्यक असेल त्याप्रमाणे ग्राहकाला केवायसीच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रं पुरवावी लागतील. तुम्ही तुमच्या ओळखीच्या वैधतेची खात्री करण्यासाठी आवश्यक असतील त्या चौकशी करण्यासाठीचे अधिकार डिजिगोल्ड आणि वितरकाला देत आहात. डिजिगोल्ड आणि वितरकाला वेळोवेळी पुरविलेल्या माहितीच्या अचूकतेसाठी तुम्ही जबाबदार असाल. जर तुम्ही दिलेल्या माहितीमध्ये कुठली त्रुटी आहे असे वाटण्याचे तुमच्याकडे काही कारण असल्यास तुम्ही त्वरित अचूक / अद्ययावत माहिती पुरविणे आवश्यक आहे.

10.2.जर केवायसी कागदपत्रे / माहिती चुकीची असली किंवा कागदपत्रे / माहिती चुकीची आढळल्यास किंवा तुमच्या कागदपत्रे/ माहितीची अधिकृतता संशयास्पद आढळल्यास, वितरक आणि/किंवा वितरकाच्या मार्फत डिजिगोल्ड कोणतेही ग्राहक खाते, तुम्हाला पूर्वसूचना देऊन अथवा न देता, संपुष्टात आणण्याचे हक्क राखून ठेवते. तुम्ही तुमची स्वतःची ओळख पटवण्यात आणि तुमचे खाते वेळीच वैध करण्यात कसूर केल्यामुळे आणि / किंवा चुकीच्या केवायसी कागदपत्रे / माहितीमुळे उद्भवणारे नुकसान, दावे, उत्तरदायित्व खर्च इत्यादींपासून तुम्ही वितरक आणि / किंवा डिजिगोल्डला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी याद्वारे घेत आहात.

10.3.तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) आणि पडताळणी

10.3.1.कोणतीही ऑर्डर देण्यापूर्वी तुम्हाला वितरक आणि/किंवा डिजिगोल्डला आवश्यक असेल त्याप्रमाणे ज्या स्वरूपात आणि पद्धतीने योग्य वाटेल त्याप्रमाणे काही विशिष्ट केवायसी कागदपत्रे पुरविणे आवश्यक असू शकते.

10.3.2.एकदा अशी कागदपत्रे आणि इतर माहिती तुमच्याकडून वितरकाला पुरविण्यात आली की तुम्हाला प्लॅटफॉर्मवर ऑर्डर (“ग्राहक ऑर्डर”) नोंदवण्याचा अधिकार प्राप्त होईल.

10.3.3.तुम्ही सहमत आहात की तुम्ही ग्राहक खाते तयार केल्यानंतर प्लॅटफॉर्मचा तुमचा चालू राहणारा वापर हा तुम्ही पुरविलेली कागदपत्रे/माहितीच्या डिजिगोल्ड आणि/किंवा वितरकाने केलेल्या पडताळणीच्या अधीन असेल. तुम्ही याद्वारे सहमत आहात की अशी पडताळणी डिजिगोल्ड आणि/किंवा वितरकाला त्यांना योग्य वाटेल त्या स्वरुपात आणि पद्धतीने पार पाडण्याचे अधिकार देत आहात.

10.3.4.याशिवाय तुम्ही हे स्वीकार करता की डिजिगोल्ड आणि/किंवा वितरक अशा प्रकारची पडताळणी एकतर ग्राहक खात्याची नोंदणी करताना किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी करण्याचे हक्क राखून ठेवतात.

10.4.ग्राहकाची दायित्वे

10.4.1.तुम्ही ग्राहक खात्यासंबंधीच्या माहितीची गोपनीयता पाळण्यास जबाबदार असाल आणि ग्राहक खात्यांतर्गत होणाऱ्या सर्व क्रियांकरीता सर्वस्वी जबाबदार असाल. ग्राहक खात्याचा कोणताही अनधिकृत वापर झाल्यास किंवा सुरक्षेचे उल्लंघन झाल्यास त्वरीत वितरकाला त्याबद्दल कळवण्यास तुम्ही सहमत आहात. तुम्ही या विभागाचे अनुपालन न केल्यास त्यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसान अथवा हानीसाठी डिजिगोल्ड किंवा वितरक जबाबदार असू शकत नाहीत आणि असणार नाहीत. तुम्ही ग्राहक खात्याच्या माहितीची गोपनीयता न राखल्याच्या परिणामी ग्राहक खात्याच्या अधिकृत अथवा अनधिकृत वापर होऊन डिजिगोल्ड अथवा वितरक अथवा प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही वापरकर्त्याचे अथवा आगंतुकाचे नुकसान अथवा हानी झाल्यास त्याकरीता तुम्हाला जबाबदार धरले जाऊ शकते.

10.4.2.नोंदणी अर्जात तुम्ही पुरविलेली ग्राहक खाते माहिती ही संपूर्ण, अचूक आणि अद्ययावत असणे तुम्ही सुनिश्चित कराल. प्लॅटफॉर्म आणि/किंवा सेवांचा लाभ घेण्यासाठी इतर कुणा ग्राहकाच्या खात्याच्या माहितीचा वापर करणे सक्त निषिद्ध आहे.

10.4.3.तुम्ही सहमत होता की तुम्ही दिलेली माहिती असत्य, चुकीची, वर्तमान नसलेली किंवा अपूर्ण असली (किंवा पुढे असत्य, चुकीची, वर्तमान नसलेली किंवा अपूर्ण झाली)किंवा वितरक आणि डिजिगोल्डकडे अशी माहिती असत्य, चुकीची, वर्तमान नसलेली, अपूर्ण किंवा ह्या नियमांशी सुसंगत नसल्याचा संशय येण्यास काही आधार मिळाला तर वितरक किंवा वितरकामार्फत डिजिगोल्डला प्लॅटफॉर्मवरील ग्राहक खात्याची तुमची प्रवेशसुलभता अनिश्चितपणे स्थगित करण्याचा किंवा संपवण्याचा किंवा रोखण्याचा हक्क असेल.

11. सोन्याची खरेदी

11.1.तुम्ही प्लॅटफॉर्मवर दाखवलेल्या बाजारभावाशी जोडल्या गेलेल्या सोन्याच्या किमतीनुसार रु.1.00 (रुपया एक फक्त) आणि त्याहून वर वाढीव मूल्याचे गोल्ड विकत घेण्याचा प्रस्ताव देऊ शकता. बाजाराशी जोडलेली किंमत ह्याचा अर्थ असा की हे भाव भारताच्या व्यावसायिक सुवर्ण बाजारातील किंमतींशी जोडलेल्या असतात.

11.2.हे याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे की बाजाराशी जोडल्या गेलेल्या सोन्याच्या अशा किंमती म्हणजे पूर्णपणे बंधनकारक प्रस्ताव असतील आणि त्या बाजारभावाने गोल्ड विकत घेण्याचे सर्व ग्राहकांकरीता असे ते निमंत्रण असेल. ह्याआधी काहीही नमूद करण्यात आले असले तरी, तुम्ही हे समजत आहात की ह्या किमती एका दिवसभरात अनेक वेळा बदलत असतात, आणि कोणत्याही ऑर्डरसाठी तुमचे दायित्व हे त्यावेळी चालू असलेल्या, बाजारभावावर अवलंबून असेल. जरी तुम्हाला स्पर्धात्मक दराने ग्राहक गोल्ड देऊ करण्यासाठी वाजवी प्रयत्न केले जाणार असले तरी तुम्हाला देऊ करण्यात येणारे दर हे बाजारातील उपलब्ध किंमतींच्या जवळपास असतील किंवा तुलना करता येण्यायोग्य असतील ह्याची कोणतीही हमी नाही.

11.3.देय हे प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या पेमेंट पर्यायांद्वारे स्वीकारले जाईल, ज्यात डिजिगोल्डसह इतर तृतीय पक्ष अथवा प्लॅटफॉर्मचे यजमानपद असलेल्या एखाद्या पेमेंट गेटवेवर पुनर्निर्देशित केले जाण्याचा समावेश असू शकतो. सोन्याची खरेदी / पूर्तता / फेरविक्री / हस्तांतरणाच्या वेळेस संबंधित कर हे लागू असलेल्या शासकीय नियमनांच्या आकारले जातील. ह्याद्वारे हे स्पष्ट करण्यात येत आहे की एकदा ग्राहक ऑर्डर देण्यात आली की तुम्हाला ग्राहक ऑर्डर रद्द करण्याचे अधिकार नाहीत, तथापि कोणत्याही कारणास्तव पेमेंट करण्यात आले नाही तर ग्राहक ऑर्डर रद्द झाल्याचे समजण्यात येईल.

11.4.ग्राहक ऑर्डर नोंदवण्यापूर्वी तुम्ही दिलेली माहिती स्वीकार्य नसल्याचे आढळल्यास आणि तुम्ही गोल्ड विकत घेण्यासाठी पात्र नाही आहात असे वितरक आणि डिजिगोल्ड ह्यांचे मत झाल्यास वितरक आणि/किंवा डिजिगोल्ड हे ग्राहक ऑर्डर रद्द करण्याचा हक्क राखून ठेवतात. ग्राहक खाते मग त्याप्रमाणे बदलण्यात येईल. वितरक आणि डिजिगोल्ड ह्यांना संतोषजनक अशा स्वरुपात आणि पद्धतीने केवायसी आणि इतर कागदपत्रे मिळेपर्यंत तुमचे ग्राहक खाते गोठवून ठेवण्याचा अधिकार वितरक तसेच डिजिगोल्ड राखून ठेवतात.

11.5.एकदा डिजिगोल्डने रक्कम स्वीकारल्यावर आणि केवायसी माहिती स्वीकार्य असल्याचे आढळल्यावर डिजिगोल्ड तुमच्या ग्राहक ऑर्डरची पुष्टि करणारे एक चालान अशी ग्राहक ऑर्डर नोंदवण्याच्या 3 (तीन) कामाच्या दिवसांच्या अवधीत, त्यांना योग्य वाटेल अशा पद्धतीने जारी करेल.

11.6.ह्या नियमांमध्ये विरोधी असे काहीही आढळले तरी वितरक आणि/किंवा डिजिगोल्ड ह्यांना कोणत्याही कारणास्तव, सर्वस्वी त्यांच्या विवेकबुध्दीनुसार एखाद्या ग्राहकाला स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार असेल.

11.7.डिजिगोल्डने पेमेंट्स स्वीकारलेले असतना एखादी ग्राहक ऑर्डर ह्या नियमांना अनुसरून नाकारण्यात आली तर असे पेमेंट्स हे प्लॅटफॉर्मवर सूचित केलेले नियम आणि अटींच्या अधीन राहून, तुमच्या खात्याशी जोडलेले असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येतील.

12. सोन्याचे वितरण (डिलिव्हरी)

12.1.हा प्लॅटफॉर्म, ह्या नियमांच्या अनुसार ग्राहक गोल्ड संपादन करण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांकरीता सेवा देऊ करतो.

12.2.प्लॅटफॉर्मचा वापर करून ग्राहक सोन्याचे वितरण (“डिलिव्हरी विनंती”) संपादन करण्याचा अधिकार तुम्हाला असेल.

12.3.डिलिव्हरी विनंती नोंदवल्यावर, तुम्ही लागू असलेले शुल्क भरून तुमच्या डिलिव्हरी विनंतीची पुष्टी करणे आवश्यक असेल. तुमच्या ग्राहक खात्यात वितरण करावयाच्या ग्राहक सोन्याच्या प्रमाणात तात्पुरती जमा करण्यात येईल (“डिलिव्हरी झालेले ग्राहक गोल्ड”).

12.4.डिलिव्हरी विनंतीची पुष्टी झाल्यानंतर 7 (सात) दिवसांच्या कालावधीत किंवा डिजिगोल्डच्या आवश्यकतेनुसार पुढील कालावाधीमध्ये डिजिगोल्ड तुम्ही दिलेल्या पाठवण्याच्या पत्त्यावर डिलिव्हरी होण्याची व्यवस्था करेल. अशा डिलिव्हरी विनंतीची प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही प्लॅटफॉर्मवर अचूक पत्ता दिलेला आहे, ह्याची खातरजमा करण्याची जबाबदारी ही सर्वस्वी तुमची असेल. डिजिगोल्डने डिलिव्हरी विनंतीची प्रक्रिया केल्यानंतर पाठवण्याचा पत्ता बदलण्याचा अधिकार तुम्हाला नसेल.

12.5.तुम्ही डिलिव्हर झालेले पॅकेज काळजीपूर्वक तपासले पाहिजे आणि पॅकेजशी छेडछाड झाली असल्यास डिलिव्हरी स्वीकारली नाही पाहिजे. तथापि, जर तुमचे असे मत असेल की पॅकेजशी छेडछाड करण्यात आली आहे तर तुम्ही तसे डिजिगोल्डला त्वरीत कळवणे आणि डिजिगोल्डला त्या संदर्भात आवश्यक असल्याप्रमाणे इतर माहिती दिली पाहिजे (“परतावा विनंती”). डिलिव्हरी झालेल्या ग्राहक सोन्याचे मूळ पॅकेज डिजिगोल्डला, डिजिगोल्डने सूचित केलेला पद्धतीने परत डिलिव्हर झाल्यानंतर 14 (चौदा) दिवसांच्या कालावधीत डिजिगोल्ड तुम्ही सूचित केलेल्या पाठवण्याच्या पत्त्यावर डिलिव्हरी झालेल्या ग्राहक सोन्याच्या फेर-डिलिव्हरीची व्यवस्था करेल. अशा मालवाहतुकीचा (शिपिंग) खर्च डिजिगोल्ड धारण करेल. तथापि, तुम्ही उथळ किंवा असमर्थनीय कारणास्तव परतावा विनंती केली असल्यास, तुम्हाला ब्लॅक-लिस्ट करणे अथवा प्लॅटफॉर्मवरील सेवा वापरण्यापासून तुम्हाला रोखणे यांसह त्यांना उपलब्ध असलेल्या सर्व कारवाई करण्याचे हक्क वितरक आणि/किंवा डिजिगोल्ड राखून ठेवतात.

12.6.डिलिव्हरी पावतीवर सही करून तुम्ही हे स्वीकारता की डिजिगोल्डकडे नोंदवलेल्या डिलिव्हरी विनंतीच्या संदर्भातले डिलिव्हरी झालेले ग्राहक गोल्ड तुम्हाला प्राप्त झाले आहे. अशा डिलिव्हरीच्या संदर्भात आणि/किंवा ह्या नियमांच्या अनुपालनाबाबत तुमच्याकडून कसूर झाल्यास, कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही पुढील तक्रारीच्या बाबतीत डिजिगोल्ड कोणत्याही परताव्यास/बदलीस जबाबदार असणार नाही.

12.7.डिजिगोल्डद्वारे डिलिव्हरी विनंती प्राप्त झाल्यावर ग्राहक खात्यातील डिलिव्हरी झालेले ग्राहक गोल्ड हे ग्राहक खात्यातून वजा (डेबिट) केले जाईल.

12.8.डिलिव्हरीच्या वेळेस डिलिव्हरी झालेले ग्राहक गोल्ड स्वीकरण्यास तुम्ही उपलब्ध असाल ह्याची खातरजमा करण्याची जबाबदारी तुमची असेल. जर तुम्ही डिलिव्हरीच्या समयी गैरहजर असलात तर डिलिव्हरी एजंट कुरिअर ते पॅकेज डिजिगोल्डला परत करण्याआधी माल तुम्हाला डिलिव्हर करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. जर डिलिव्हर झालेले गोल्ड डिजिगोल्डला परत करण्यात आले तर त्या परिस्थितीत डिलिव्हरी झालेले गोल्ड, तुम्हाला लागू असणारे शुल्क (असल्यास) वगळून ग्राहक खात्यामध्ये जमा करण्यात येईल, मात्र त्यासाठी पॅकेजिंगशी छेडछाड झालेली नाही आहे असे डिजिगोल्डचे मत होणे आवश्यक आहे. हे ह्याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे की जर तुमच्याकडून पुन्हा डिलिव्हरी करण्याची विनंती करण्यात आली तर डिलिव्हरी झालेले गोल्ड डिलिव्हर करण्यासाठी लागलेला, लागू होईल तो सर्व खर्च धारण करण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची असेल.

12.9.एखाद्या अपरिहार्य आपत्तीमुळे डिजिगोल्ड डिलिव्हरी झालेल्या ग्राहक सोन्याची डिलिव्हरी करण्यास असमर्थ ठरले तर डिजिगोल्ड त्याबद्दल तुम्हाला सूचित करेल आणि एका विशिष्ट प्रकारे तुम्हाला सदर डिलिव्हरी करणे आवश्यक असल्याचे सांगेल. तुम्ही ह्याद्वारे स्वीकार करत आहात की अशा परिस्थितीत, डिलिव्हरी पूर्ण करण्यास आवश्यक असलेला अतिरिक्त खर्च आणि शुल्क तुम्ही धारण कराल.

12.10.डिजिगोल्डने ठरवलेलया किमान सीमेपेक्षा (“किमान सीमा प्रमाण”) कमी अशा क्षुल्लक प्रमाणातील सोन्याची ग्राहक विनंती करण्यात आली तरी डिजिगोल्ड अशा क्षुल्लक प्रमाणातील गोल्ड डिलिव्हर करू शकणार नाही. किमान सीमा प्रमाण हे वेळोवेळी सुधारीत केले जाण्याची शक्यता असल्यामुळे तुम्ही मधूनमधून प्लॅटफॉर्मवर किमान सीमा प्रमाण तपासावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. किमान सीमा प्रमाणापेक्षा कमी प्रमाणातले गोल्ड तुम्हाला डिलिव्हर केले जायचे असेल तर कृपया ह्याची नोंद घ्या की असे ग्राहक गोल्ड हे त्याऐवजी डिजिगोल्डद्वारे प्लॅटफॉर्मवर दर्शवलेल्या विक्री भावाच्या आधारावर विकण्यात येईल आणि तुम्हाला त्याऐवजी लागू होणारी विक्रीतून मिळालेली रक्कम ही तुमच्या त्या बँक खात्यात जमा करण्यात येईल ज्याचे तपशील तुमच्याद्वारे देण्यात आलेले आहेत. जर तुम्ही दिलेल्या बँक खात्याच्या क्रमांकात काही चूक असेल तर त्यासाठी वितरक आणि/किंवा डिजिगोल्डला जबाबदार ठरवता येणार नाही.

12.11.ह्या नियमांमध्ये काहीही ह्याविरोधी असले तरीही, डिजिगोल्डला इथल्या नियमांत बसत नसलेल्या ग्राहक विनंतींना नाकारण्याचा अधिकार असेल आणि डिजिगोल्ड तसे करण्याची कारणे ग्राहकाला कळवेल.

12.12.(ग्राहक ऑर्डर्स आणि/किंवा ग्राहक विनंतींच्या बदल्यात) ग्राहक खात्यात करण्यात आलेल्या बदलांच्या आधारे जर तुम्हाला असे वाटत असेल की तिथे करण्यात आलेले बदल हे तुम्ही नोंदवलेल्या ऑर्डर आणि/किंवा ग्राहक विनंतींशी सुसंगत नाही आहेत असे तुमचे मत असेल तर तुम्ही वितरकाशी [-] येथे (किंवा वितरकाने कळवलेल्या ह्या संदर्भातल्या कोणत्या पत्त्यावर) संपर्क साधू शकता जो त्याप्रमाणे अशा ओळखण्यात आलेल्या कोणत्याही विसंगतींबाबत योग्य ती उपाययोजना करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल.

12.13.हे ह्याद्वारे स्पष्ट करण्यात येते की ग्राहक गोल्ड हे तुमच्याकडून अन्य कोणत्याही ग्राहकाकडे गहाण ठेवता अथवा हस्तांतरित करता येणार नाही, आणि ग्राहक खाते हे डिजिगोल्डने विशिष्टपणे अनुमती दिल्याशिवाय अहस्तांतरणीय आहे. तुमच्या मृत्यूच्या परिस्थितीत, डिजिगोल्डने विशिष्टपणे परवानगी दिल्यास, वॉल्ट आणि ग्राहक खात्यात पडून असलेल्या अशा गोल्ड अधिकार हा तुमच्या कायदेशीर वारसांना आवश्यक ती सर्व योग्य खबरदारी पाळण्यात आल्यानंतरच देण्यात येईल. त्यानंतर, तुमचे कायदेशीर वारस हे ग्राहक गोल्ड आणि ग्राहक खात्याच्या बाबतीत ग्राहक समजण्यात येतील आणि हे नियम तुमच्या कायदेशीर वारसदारांना लागू होतील.

12.14.हे ह्याद्वारे स्पष्ट करण्यात येते की ह्या प्लॅटफॉर्मवर विकत घेण्यासाठीच्या वस्तू उपलब्ध आहेत. काही वस्तू ह्या स्क्रीनच्या मूलभूत ठेवणीमुळे (डीफॉल्ट्स) आणि फोटोग्राफीच्या तंत्रामुळे मूळ आकारापेक्षा किंचित मोठ्या अगर लहान दिसू शकतात. वितरक किंवा डिजिगोल्डवर ह्या आधारे कोणतीही कायदेशीर कारवाई योजता येणार नाही. उत्पादनाशी संबंधित सर्व तपशील प्लॅटफॉर्मवर स्पष्टपणे दर्शवले जावेत यासाठी वितरक प्रयत्नरत असेल.

12.15.डिजिगोल्ड किंवा वितरकाशी थेट संबंधित नसलेल्या कारणांमुळे, प्लॅटफॉर्मवरील अथवा प्लॅटफॉर्मवर प्रवेश करता यावा म्हणून त्याच्याशी जोडले गेलेल्या साधनांमधील प्रणालीगत त्रुटींमुळे डेटा हा प्लॅटफॉर्मवर सदोष रीतीने दर्शवला जाऊ शकतो. असे दोष किंवा त्रुटी आल्यास त्या सुधारण्याचे कोणतेही अथवा सर्व हक्क वितरक राखून ठेवतो आणि चुकीच्या किंवा सदोष किंमतींवर आधारित तुमच्या विनंती/आदेश मान्य न करण्याचा अधिकार वितरक अथवा डिजिगोल्डला असेल.

12.16.प्लॅटफॉर्मवरील किंमती ह्या निश्चित असून त्याबाबत घासाघीस करण्यात येणार नाही. प्लॅटफॉर्मवरील सदर किमती ह्या तुम्हाला कोणतीही सूचना न देता बदलण्याच्या अधीन आहेत.

13. ग्राहक गोल्ड विकणे

13.1.तुम्हाला प्लॅटफॉर्मवरील विक्री किंमतींच्या आधारे बाजाराच्या वेळेत ग्राहक गोल्ड विकण्याचा पर्याय देण्यात येईल. जर त्या किमती तुम्हाला स्वीकार्य असततील तर तुम्ही डिजिगोल्डला स्वीकार्य असलेल्या स्वरुपात आणि पद्धतीने (“विक्री विनंतीची”) (“ग्राहकास गोल्ड विकले”) पुष्टी करू शकता.

13.2.विक्री विनंतीची पुष्टी झाल्यानंतर 2 (दोन) दिवसांच्या कालावधीत किंवा आवश्यक भासेल त्याप्रमाणे पुढील कालावधीत विक्री विनंतीशी संबंधित असलेले पेमेंट, अशी विनंती करण्याच्या वेळी सूचित करण्यात आलेल्या विक्री दराने, डिजिगोल्डद्वारे वितरीत करण्यात येईल. डिजिगोल्ड असे पेमेंट हे तुम्ही तपशील पुरविलेल्या तुमच्या बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था करेल. जर तुम्ही दिलेला बँक खाते क्रमांक, आयएससी कोड इत्यादींमध्ये काही चूक असेल, तर डिजिगोल्डला त्याकरता जबाबदार धरता येणार नाही.

13.3.हे ह्याद्वारे स्पष्ट करण्यात येते की डिजिगोल्ड आणि/किंवा वितरक ह्या सेवा सर्वोत्तम प्रयत्नांच्या आधारे पुरवेल आणि जेव्हा व्यावसायिक गोल्ड बाजार क्रियाशील असेल तेव्हाच पुरवेल. हा पर्याय तुम्हाला सर्वकाळ उपलब्ध असेल अशी कोणतीही हमी डिजिगोल्ड आणि वितरक देत नाहीत. याखेरीज, विकलेले ग्राहक गोल्ड खरेदी करणारा खरेदीदार एकतर डिजिगोल्ड किंवा (विकलेले ग्राहक गोल्ड विकत घेण्यात रस असलेला) इतर कोणता पक्ष असू शकेल. वितरक आणि/किंवा डिजिगोल्डला अशा तृतीय-पक्षीय खरेदीदाराच्या कोणत्याही कृतीसाठी जबाबदार धरता येणार नाही.

13.4.तुम्हाला तुमचे ग्राहक गोल्ड साठवण्यासाठी डिजिगोल्डने वेळोवेळी स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार निश्चित केलेल्या आणि प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांना सूचित केलेल्या अशा कालावाधीकरता मोफत साठवणीची (स्टोरेज) सुविधा पुरविण्यात येईल (“मोफत साठवण कालावधी”). मोफत साठवण कालावधी संपुष्टात आल्यानंतर अशा ग्राहक सोन्याकरीता, प्लॅटफॉर्मवर निर्दिष्ट केलेल्या, आणि वेळोवेळी बदलला जाऊ शकेल अशा दराने, साठवण शुल्क आकारण्याचा अधिकार डिजिगोल्डला असेल. हे शुल्क निर्दिष्ट दराच्या टक्केवारीच्या रकमेनुसार दर महिन्याच्या शेवटी गोल्ड शिलकीतून कापले जाऊन आकारण्यात येतील. तुम्ही नियमितपणे प्लॅटफॉर्मवर येऊन साठवण शुल्क समजून घ्यावेत, असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. तुमची गोल्ड शिल्लक खूप कमी असल्यामुळे डिजिगोल्डला असे शुल्क कापून घेता न आल्यास, सबंधित थकित शुल्क वसूल करण्यासाठी आवश्यक अथवा गरजेचे असल्याप्रमाणे वॉल्ट कीपरकडे साठवलेल्या तुमच्या ग्राहक गोल्ड काही हिस्सा विकण्याचा अधिकार डिजिगोल्डकडे असेल.

13.5.ग्राहक सोन्यासाठी तुम्हाला स्पर्धात्मक किंमत मिळावी यासाठी वाजवी प्रयत्न करण्यात येतील, मात्र तुम्हाला देऊ करण्यात आलेल्या किमती ह्या बाजारात उपलब्ध असलेल्या किमतींच्या जवळ अथवा तुलना करता येण्यासारख्या असतील अशी कोणतीही हमी देण्यात येत नाही आहे.

13.6.सोने खरेदी केल्याच्या 5 दिवसांमध्ये तुम्ही विकू शकणार नाही. 5 दिवसांपूर्वी गोळा केलेले सोने विकले जाऊ शकते.

14. प्लॅटफॉर्म आणि सेवांचा वापर

14.1.तुम्ही स्वीकार करता की ह्या सेवा तुमच्या वैयक्तिक वापराकरीता आहेत आणि तुम्ही सोन्याच्या किमती किंवा सोन्याचे वर्णन आणि/किंवा प्लॅटफॉर्मवर दर्शवलेली (प्लॅटफॉर्मवरील तुमच्या प्रवेशसुलभतेमुळे मिळालेली) इतर कोणतीही माहिती इतर कोणत्याही माध्यमावर प्रकाशित करणार नाही. तुम्ही ह्या सेवांमधून प्राप्त केलेली कोणतीही माहिती, सॉफ्टवेअर, उत्पादने किंवा सेवांमध्ये कोणतीही सुधारणा, नक्कल, वितरण, प्रक्षेपण, प्रदर्शन, निष्पादन, पुनरुत्पादन, प्रकाशन, परवाना देणे, त्यातून व्युत्पन्न झालेले उत्पदान तयार करणे असे प्रकार करणार नाहीत.

14.2.हे नियम आणि गोपनीयता धोरणाच्या अधीन राहून, तुम्ही याद्वारे डिजिगोल्ड आणि वितरकाला खालील उद्देशांसाठी अनन्य नसलेले, जगद्व्याप्त, स्वामित्वाधिकार-मुक्त असे हक्क देत आहात: (अ) प्रत्येक बाबतीत, तुम्हाला सेवा पुरविण्यासाठी आवश्यक असलेल्या मर्यादेपुरता, तुमचा डेटा गोळा करणे, साठवणे आणि प्रक्षेपित करणे, आणि (ब) तुम्ही निर्देशित केल्याप्रमाणे अथवा ह्या सेवांच्या मार्फत शक्य असल्याप्रमाणे तुमचा डेटा इतर लोकांना देणे किंवा इतर लोकांशी त्याबाबत चर्चा करणे, वितरीत करणे आणि सार्वजनिकपणे जाहीर करणे आणि प्रदर्शित करणे. तुम्ही गोल्ड विकत घेत असताना अथवा गोल्ड विकत असताना प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही सेवा वापरताना जो डेटा उत्पन्न कराल तो लागू असलेल्या कायद्यानुसार आवश्यक असेल त्याप्रमाणे वितरकाला योग्य वाटेल त्या पद्धतीने वितरकाने वापरण्यास आणि/किंवा इतरांना देण्यास सहमती द्याल. वितरक सदर डेटा डिजिगोल्डला देऊ शकेल, जे बदल्यात तुमचा डेटा सुरक्षा विश्वस्तांना त्यांना सुरक्षा विश्वस्ताची कर्तव्ये पार पाडण्यासाठी देऊ शकते. तुमचा डेटा नेहमी विभाग 2.1 मध्ये आखून देण्यात आल्याप्रमाणे गोपनीयता दायित्वांच्या अधीन असेल. हे ह्याद्वारे स्प्ष्ट करण्यात येते की प्लॅटफॉर्मवर गोल्ड विकत घेत असताना उत्पन्न झालेला कोणताही डेटा हा डिजिगोल्डच्या मालकीचा असेल.

14.3.तुम्ही प्रतिनिधित्व करता आणि हमी देता की: (i) तुम्ही वितरकाला आणि डिजिगोल्डला तुमचा सर्व डेटा देण्यासाठी आणि ह्या नियमांमध्ये वितरकाला आणि डिजिगोल्डला देण्यात आलेले सर्व हक्क देण्यासाठी आवश्यक असलेले हक्क, मुक्ती आणि परवानग्या मिळवलेल्या आहेत आणि (ii) ह्या नियमांतर्गत तुम्ही अधिकृत केल्याप्रमाणे तुमचा डेटा तसेच वितरक आणि डिजिगोल्डने तो डेटा हस्तांतरित करणे आणि त्याचा वापर करणे हे कोणत्याही कायद्याचे किंवा बौद्धिक संपदा हक्क, गोपनीयतेचा अधिकार, आणि प्रचाराचा अधिकार यांसह कोणाही तृतीय पक्षाच्या अधिकाराचे उल्लंघन करणारे ठरत नाही आणि इथे अधिकृत करण्यात आलेला कोणताही वापर, संग्रहण आणि प्रकटीकरण हे कोणत्याही लागू गोपनीय धोरणांच्या नियमांशी विसंगत नाही. ह्या नियमांतर्गत त्यांच्यावर असलेल्या सुरक्षेसंबंधित दायित्वाशिवाय वितरक आणि/किंवा डिजिगोल्ड तुमचा डेटा आणि त्याचा वापर, प्रकटन, साठवण किंवा प्रक्षेपणाच्या परिणामांची कोणतीही जबाबदारी धारण करीत नाही.

14.4.डेटा भ्रष्ट होणे, किंवा अपरिहार्य आपत्तींमुळे कार्यनिष्पादनात विलंब किंवा अपयश यांसारखा नियंत्रणाबाहेरील कोणत्याही कारणांमुळे तुमचा डेटा, तांत्रिक किंवा अन्यथा, माहिती, किंवा तुम्ही पुरविलेल्या कोणत्याही बाबींचे नुकसान झाल्यास वितरक आणि/किंवा डिजिगोल्ड त्यासाठी जबाबदार राहणार नाहीत.

14.5.त्यांना कोणत्या ठिकाणी आणि पिन कोड्सवर सेवा पुरवायाच्या आहेत हे ठरवण्याचे सर्वाधिकार डिजिगोल्डचे आहेत.

14.6.देखरेख, दुरुस्ती, सुधारित करणे किंवा नेटवर्क अथवा उपकरणांमधील बिघाड यांसह कोणत्याही कारणांमुळे सेवा पुरविणे खंडित होऊ शकते. सेवा सुरळीतपणे चालू रहाव्यात म्हणून वितरक आणि डिजिगोल्ड प्रयत्नरत असतात परंतु, सर्व ऑनलाइन सेवा ह्या प्रासंगिक व्यत्यय आणि तुटींमुळे खंडित होत असतात. त्यांच्या परिणामी तुम्हाला कोणताही व्यत्यय अथवा नुकसान सोसावे लागल्यास त्यास वितरक आणि डिजिगोल्ड जबाबदार असणार नाहीत.

14.7.डिजिगोल्ड कोणत्याही समयी काही वैशिष्ट्ये तसेच काही विशिष्ट साधने आणि प्लॅटफॉर्म्सकरीता सहाय्य यांसह काही किंवा सर्व सेवा बंद करू शकते.

15. ग्राहक खाते स्थगित/बंद करणे

15.1.जर खात्यात फसवणुकीचे किंवा संशयास्पद व्यवहार होत असल्याचे आढळून आले तर डिजिगोल्ड, आपल्या विवेकबुद्धीनुसार, ग्राहकांचे ग्राहक खाते बंद करू शकते. जर तुम्ही कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात गुंतले आहात किंवा ग्राहक खाते हे बेकायदेशीर कृत्यांसाठी वापरले जात आहे असे वितरक आणि/किंवा डिजिगोल्डला वाटले तर तुम्हाला त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील सेवांबाबत ब्लॅकलिस्ट करणे किंवा त्या वापरण्यापासून तुम्हाला रोखणे किंवा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सेवा वापरण्यासाठीची तुमची प्रवेशसुलभता रोखणे किंवा अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती संबंधित प्राधिकरणाला देणे यांसह त्यांना उपलब्ध असलेल्या सर्व मार्गांचा अवलंब करण्याचे अधिकार वितरक आणि/किंवा डिजिगोल्डला असतील.

15.2.डिजिगोल्ड आणि वितरक ह्यांच्यातील व्यवस्था संपुष्टात आली तर त्या परिस्थितीत किंवा अन्यथा वितरकाने डिजिगोल्डसह असलेले संबंध संपवण्याचा निर्णय घेतल्यास तुमचे ग्राहक खाते बंद केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत, तुमची गोल्ड शिलकीपर्यंत www.safegold.com वर पोहचता येऊ शकते आणी डिजिगोल्ड सेवा पुरविणे आणि ग्राहक सहाय्यता किंवा तुमच्या गोल्ड शिलकीचे वितरण / सेवा देने चालू ठेवू शकते.

15.3.त्यांच्यामुळे न झालेल्या प्लॅटफॉर्ममधील तांत्रिक बिघाड आणि / किंवा कृत्य आणि / किंवा वगळणे ह्यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही नुकसान / दायित्वास वितरक आणि/किंवा डिजिगोल्ड ह्यांच्यापैकी कोणीही कोणत्याही पद्धतीन जबाबदार असणार नाहीत.

15.4.तुमच्या ग्राहक खात्यात कोणताही अनियमितपणा किंवा विसंगती असल्याचे आढळून आल्यास तुम्ही त्वरीत, कोणत्याही परिस्थितीत 10 (दहा) दिवसांच्या आंत कळवणे आवश्यक आहे, तसे न केल्यास खात्यात कोणताही अनियमितपणा किंवा विसंगती नसल्याचे समजण्यात येईल. ग्राहकाच्या सूचना तसेच ह्या नियमांशी संबंधित असलेले (केलेल्या किंवा मिळालेल्या पेमेंट्ससह परंतु त्यापुरता मर्यादित न राहता) असे इतर कोणतेही तपशील ह्यांच्या वितरक आणि/किंवा डिजिगोल्डद्वारे इलेक्ट्रॉनिक किंवा दस्तऐवज स्वरुपातील ठेवण्यात आलेल्या सर्व नोंदी ह्या, ग्राहकाच्या विरुद्ध, अशा सूचनांचे निर्णायक पुरावे असल्याचे समजण्यात येईल.

16. शुल्क

16.1.तुम्ही ह्याद्वारे सहमत होता की प्लॅटफॉर्म आणि सेवांच्या वापराशी संबंधित असलेल्या सर्व शुल्कांसाठी उत्तरदायी असाल. याखेरीज, देणे असलेल्या सर्व शुल्कांचे (अशा शुल्कांशी तसेच त्यांच्या रकमांशी संबंधित नियमांसह परंतु त्यापुरता मर्यादित न राहता) तपशील हे प्लॅटफॉर्मवर निर्धारित करून देण्यात आले आहेत. शुल्क आणि किंमती ह्या वेळोवेळी सुधारीत केल्या जाऊ शकतात, ह्याची कृपया नोंद घ्यावी आणि प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी जाऊन त्यावेळी विद्यमान असलेले शुल्क आणि किंमती तपासण्याची जबाबदारी तुमची असेल.

16.2.हे ह्याद्वारे स्पष्ट करण्यात येते की शुल्क आणि किंमती (मोबदला) हे एकदा देण्यात आल्यानंतर ते परत केले जाऊ शकत नाहीत.

16.3.प्लॅटफॉर्मचा वापर आणि/किंवा ग्राहक सोन्याच्या खरेदीसाठी तुमच्याद्वारे करण्यात आलेले पेमेंट्स हे भारतीय रुपयांमध्ये करणे अनिवार्य असेल.

16.4.प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही उपलब्ध एक/अनेक सेवा पद्धतींचा लाभ घेण्यासाठी, आपल्यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उद्भवणारे कोणतेही नुकसान किंवा नुकसानीच्या बाबतीत डिजीगोल्ड कोणत्याही दायित्वासाठी जबाबदार असणार नाही किंवा गृहित धरले जाणार नाही:

16.4.1.कोणत्याही व्यवहारा(रां) साठी अधिकृततेचा अभाव,किंवा

16.4.2.पेमेंट करताना तुम्ही आणि तुम्ही वापरत असलेली बँक/का आणि/किंवा इतर संस्था ह्यांच्यात मिळून ठरलेली विद्यमान मर्यादा पार करणे, किंवा

16.4.3.व्यवहारातून उद्भवणारी कोणतेही समस्या, किंवा

16.4.4.कोणत्याही कारणाने(कारणांनी) व्यवहार नाकारला जाणे.

16.5.तुमच्याद्वारे तुमच्याकडून देय असलेले शुल्क वेळेत देण्यात न आल्यास डिजिगोल्ड ग्राहक खाते तात्पुरते/कायमचे स्थगित/बंद करू शकते किंवा त्यावरील प्रवेशसुलभता नाकारू शकते. डिजिगोल्डला उपलब्ध असलेले इतर अधिकार आणि उपाययोजना ह्यांच्या मर्यादा लागू न होता डिजिगोल्ड त्याकरीता कायदेशीर कारवाई करण्याचे हक्कदेखील राखून ठेवते.

17. सदस्य पात्रता

प्लॅटफॉर्मचा वापर आणि/किंवा सेवा ह्या फक्त भारतीय करार कायदा, 1872 अंतर्गत कायदेशीररीत्या बांधील असलेल्या करारात प्रवेश करू शकत असलेल्या व्यक्तींसाठीच आणि भारतात राहत असलेल्या व्यक्तींसाठीच उपलब्ध आहेत. अल्पवयस्क, मुक्त न करण्यात आलेले कर्जबाजारी आणि मेंदूत बिघाड असलेल्या व्यक्तींसह भारतीय करार कायदा, 1872 अंतर्गा “करारासाठी अक्षम” असलेल्या व्यक्ती हा प्लॅटफॉर्म किंवा ह्या सेवा वापरण्यास पात्र नाहीत.18 वर्षांखालील कोणतीही व्यक्ती ह्या प्लॅटफॉर्मवर नोंद करू शकत नाही आणि ह्या प्लॅटफॉर्मवर व्यवहार करू शकत नाही तसेच उपलब्ध असलेल्या कोणत्याही सेवा प्राप्त करण्यासाठी प्लॅटफॉर्मचा वापर करू शकत नाही. जर कुणी व्यक्ती प्लॅटफॉर्म आणि/ किंवा कोणतीही सेवा वापरण्यास पात्र नाही असे डिजिगोल्डच्या निर्दर्शनास आणून देण्यात आले अथवा तसे आढळले तर त्या व्यक्तीची सदस्यता संपवणे आणि/किंवा अशा व्यक्तीचा प्लॅटफॉर्मवरील आणि/किंवा कोणत्याही सेवांसाठी प्रवेश नाकारणे हे उपाय योजण्याचा अधिकार डिजिगोल्ड राखून ठेवते.

18. संबंधाचा अभाव

18.1.गोल्ड खरेदी / विक्रीविषयक सूज्ञ निर्णय घेण्यासाठी आवश्यक असा पुरेसा अनुभव आणि ज्ञान तुम्हाला आहे ह्याचे तुम्ही वितरक आणि डिजिगोल्डला प्रतिनिधित्व कराता आणि हमी देता. तुम्ही हे स्वीकार करता की तुम्ही वितरक किंवा डिजिगोल्ड ह्यांपैकी कोणीही उपलब्ध करून दिलेल्या माहितीवर विसंबून नाही आहात आणि गोल्ड खरेदी / फेरविक्रीच्या संदर्भात वितरक किंवा डिजिगोल्ड कोणतीही शिफारस करत नाही आहे. तुम्ही आणि वितरक आणि/किंवा डिजिगोल्ड ह्यांच्यामध्ये विक्रेता-खरेदीदार याखेरीज कोणतेही एजंट-प्रमुख, सल्लागार-सल्ला प्राप्तकर्ता, कोणतेही कर्मचारी-मालक, कोणतेही फ्रेंचाइझी-फ्रेंचायझर नाते, कोणताही संयुक्त प्रकल्प संबंध किंवा कोणताही भागीदारी संबंध यांसह परंतु यापुरता मर्यादित न राहता, कोणतेही नाते अस्तित्वात नाही.

18.2.तुम्ही स्वीकार करता की डिजिगोल्ड आणि वितरक हे कोणतेही गुंतवणुकीचे उत्पादन पुरवित / विकत / देऊ करत नाहीत आणि कोणतीही हमी / आश्वस्त परतावा देऊ करत नाही आहेत. तुम्ही हेदेखील स्वीकारता की सोन्याचे मूल्य हे विभिन्न घटक आणि शक्तींवर अवलंबून बदलू शकते.

19. इलेक्ट्रॉनिक ऑर्डरींमधील जोखमी

व्यावसायिक इंटरनेट सेवा प्रदाता हे 100% विश्वसनीय नसतात आणि अशा एक किंवा त्याहून अधिक सेवा प्रदात्यांकडून सेवेत बिघाड झाल्यास इंटरनेट-आधारित ऑर्डर प्रवेशावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तुम्ही स्वीकार करता की ऑर्डर प्रवेश प्रणाली ही एक इलेक्ट्रॉनिक यांत्रिक प्रणाली आहे आणि त्यामुळे वितरक किंवा डिजिगोल्डच्या नियंत्रणाबाहेरील बिघाड त्यास होऊ शकतो. त्यामुळे प्रक्षेपण किंवा (प्लॅटफॉर्मला जोडले जाण्यासाठी वापरण्यात आलेल्या कोणत्याही साधनासह) संप्रेषण सुविधा कोलमडणे किंवा त्यातील बिघाड किंवा वितरक अथवा डिजिगोल्डच्या नियंतण अथवा अंदाजाच्या बाहेरच्या कोणत्याही कारणास्तव झालेल्या त्रुटी, निष्काळजीपणा, ऑर्डरची अंमलबजावणी करण्यातील असमर्थता, प्रक्षेपण, डिलिव्हरी किंवा ऑर्डरच्या अंमलबजावणीतील विलंब यांस वितरक किंवा डिजिगोल्ड हे जबाबदार असणार नाहीत.

20. अभिप्राय

20.1.प्लॅटफॉर्म आणि वापरकर्त्यांच्या अनुभवात सुधारणा व्हावी ह्या उद्देशाने प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमची समीक्षा आणि प्लॅटफॉर्म वापरण्याचा तुमचा अनुभव (“समीक्षा”) यावर प्लॅटफॉर्मचा वापर करून पोस्ट करण्याची परवानगी देऊ शकतो.

20.2.तुम्ही समीक्षेचे उद्गाता असल्यामुळे, तुम्ही अपलोड, पोस्ट, प्रकाशित, प्रक्षेपित किंवा इतर कोणत्या प्रकारे प्लॅटफफॉर्मवर उपलब्ध करून देत आहात त्या समीक्षांना जबाबदार आहात. तुम्ही प्रतिनिधित्व करता की अशा सर्व समीक्षा ह्या लागू असलेल्या कायद्याला अनुसरून असतील. तुम्ही स्वीकार करता की वितरक आणि/किंवा डिजिगोल्ड प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही समीक्षेचे समर्थन करत नाही आणि कोणत्याही समीक्षेसाठी उत्तरदायी अथवा जबाबदार नाहीत. प्लॅटफॉर्मवरील समीक्षांच्या बाबतीत प्रवेशसुलभता निकामी करण्याचा हक्क वितरक राखून ठेवतो.

20.3.तुम्ही ह्याद्वारे ह्या वितरकला योग्य वाटेल अशा कोणत्याही पद्धतीने, मुद्रित, प्रक्षेपित, ऑनलाइन आणि वितरकाच्या मालकीच्या कोणत्याही तसेच सर्व वेबसाइट्सवर आणि प्लॅटफॉर्म्सवर यांसह परंतु ह्यापुरता मर्यादित न राहता कोणत्याही स्वरुपात तुमच्या समीक्षांचा वापर, नक्कल, वितरण, प्रदर्शन, प्रकाशन, प्रक्षेपण, उपलब्ध करून देणे, पुनरुत्पादन, सुधार, रुपांतर करण्याचे कायमचे, परत काढून न घेता योण्याजोगे, जगद्व्याप्त, स्वामित्व हक्कापासून मुक्त आणि पोट-परवानायोग्य अधिकार आणि परवाना वितरकाला देत आहात.

20.4.याखेरीज तुम्ही प्रतिनिधित्व करता आणि हमी देता की प्लॅटफॉर्मवर कोणतीही समीक्षा पोस्ट करताना तुम्ही त्रासदायक, बदनामीकारक, अपमानास्पद, तिरस्कारपूर्ण किंवा जातीय अथवा वांशिक दृष्टिकोनातून आक्षेपार्ह भाषेचा उपयोग करणार नाही. याखेरीज, तुम्ही प्लॅटफॉर्मच्या कोणत्याही भागावर अश्लील, लैंगिक, स्त्रियांचे असभ्य प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायदा, 1986 नुसार “स्त्रियांचे असभ्य प्रतिनिधित्व” करणारी समजली जाईल अशी कोणतीही सामग्री पोस्ट करणार नाहीत.

21. गोपनीयता

गोपनीयता धोरणात वर्णन केल्याप्रमाणे वितरक आणि डिजिगोल्ड तुमच्या वैयक्तिक माहितीसह सर्व गोपनीय माहिती गोपनीय ठेवतील आणि कायद्याने आवश्यक असल्याखेरीज कोणालाही ती उघड करणार नाहीत तसेच ते स्वतःची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या सुरक्षा उपाययोजना करतात त्याच उपाययोजना अशा खाजगी माहितीच्या संरक्षणासाठीदेखील उचलण्याची खातरजमा करतील. वितरक आणि डिजिगोल्ड हे स्वीकारतात की त्यांचे कर्मचारी, संचालक, एजंट आणि कंत्राटदार ही माहिती ज्या हेतूने पुरविण्यात आलेली आहे, फक्त त्याच हेतूसाठी ह्या माहितीचा वापर करतील. आपले कर्मचारी, संचालक, एजंट आणि कंत्राटदार स्वतः गोपनीयतेच्या नियमांच्या अधीन आहेत अशा प्रकारे ह्या गोपनीयतेच्या नियमांचा स्वीकार आणि पालन करतील ह्याची खातरजमा करण्यासाठी वितरक आणि डिजिगोल्ड सर्व वाजवी प्रयत्न करतील.

22. सामग्री आणि बौद्धिक संपदा हक्क

22.1.डिजिगोल्ड पुरवित असलेल्या आणि प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित/वापरात असलेल्या सेवांशी संबंधित स्वामित्व, ट्रेडमार्क्स, सेवा चिन्हे, लोगो, व्यवसाय नावे आणि इतर सर्व बौद्धिक तसेच मालकी हक्क हे सर्वस्वी आणि अनन्य रुपाने डिजिगोल्डच्या मालकीचे आहेत आणि भारतीय कायद्यानुसार संरक्षित आहेत.

22.2.तुम्ही ह्याद्वारे स्वीकारता की ह्या सेवा म्हणजे मूळ कृती आहेत आणि डिजिगोल्डद्वारे लक्षणीय वेळ, प्रयत्न आणि पैसा खर्च करून विकसित आणि उपयोजित केलेल्या पद्धतींनी आणि प्रमाणांनुसार विकसित, संकलित, तयार, सुधारित, निवडले आणि संयोजित करण्यात आलेल्या आहेत तसेच त्या डिजिगोल्ड आणि तशा इतरांच्या अमूल्य बौद्धिक संपदा आहेत. तुम्ही ह्याद्वारे सहमत होता की तुम्ही ह्या नियमांच्या मुदतीत आणि मुदत संपल्यानंतर ह्या मालकी हक्कांचे संरक्षण कराल. तुम्ही प्लॅटफॉर्मवरील निवडक भाग स्वामित्व अधिकाराच्या सूचना कायम न ठेवून डाउनलोड करू शकत नाही. तुम्ही प्लॅटफॉर्मवरील सामग्री फक्त ह्या नियमांच्या उद्देशानेच डाउनलोड करू शकता.

22.3.कोणतेह उल्लंघन झाल्यास देशाच्या लागू कायद्यांतर्गत सर्व उपलब्ध उपाय योजून योग्य त्या मंचावर तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

23. तृतीय पक्षाच्या वेबसाइट्स/अ‍ॅप्लिकेशन्स (अनुप्रयोग) च्या/कडील लिंक्स

ह्या प्लॅटफॉर्मवर तृतीय पक्षांच्या वेबसाइट्सशी देवाण घेवाण करत असलेल्या लिंक्स आणि कार्यप्रणाली असू शकतात. अशा कोणत्याही वेबसाइट्ससाठी वितरक किंवा डिजिगोल्ड जबाबदार नाही अथवा त्यांच्या कार्यपद्धती, क्रिया, निष्क्रियता, गोपनीयता सेटिंग्स, गोपनीयता धोरणे, नियम अथवा सामग्रीबद्दल त्यांचे कोणतेही दायित्व नाही. अशा कोणत्याही वेबसाइट्सशी संवाद साधण्याकरीता देवाण-घेवाण करण्याच्या कार्यप्रणाली सक्षम करण्यापूर्वी किंवा अशा वेबसाइट्सना भेट देण्यापूर्वी तुम्ही तृतीय पक्षाच्या अशा प्रत्येक वेबसाइटचे नियम व अटी, गोपनीयता धोरणे, सेटिंग्स आणि माहिती शेअर करण्याच्या क्रियांची समीक्षा करावी आणि त्या नीट समजून घ्याव्या अशी डिजिगोल्ड प्रकर्षाने शिफारस करते.

24. नुकसानभरपाई

तुम्ही ह्याद्वारे सहमत होता की तुम्ही, (i) ग्राहकाने प्लॅटफॉर्मचा आणि/अथवा प्लॅटफॉर्मवरील प्रवेशसुलभतेसाठी केलेल्या कोणत्याही साधनाचा वापराच्या कारणाने; (ii) ग्राहकाच्या सूचनांवर वितरक आणि/किंवा डिजिगोल्डने सद्भावनेतून केलेले काम, आणि त्यावरील केलेल्या किंवा करण्यास नकार दिलेल्या किंवा करणे वगळेल्या कृतींच्या आणि विशेषतः ग्राहकाचा निष्काळजीपणा, चूक किंवा गैर-आचरणातून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे उद्भवलेल्या कारणाने; (iii) नियम आणि ग्राहक खात्याशी संबंधित कशाचेही उल्लंघन किंवा अनुपालन न करण्याच्या कारणाने; आणि/किंवा (iv) ग्राहकाकडून कोणत्याही व्यवहारासंदर्भात फसवणूक किंवा अप्रामाणिकपणाच्या कारणाने किंवा यातून उद्भवणार्‍या, प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष अशा सर्व कृती, दावे, मागण्या, कारवाई, नुकसान, हानी, खर्च, शुल्क आणि खर्च (“तोटे”) जे कोणत्याही वेळी वितरक आणि/किंवा डिजिगोल्ड आणि/किंवा त्यांचे कर्मचारी, एजंट, कामगार अथवा प्रतिनिधी ह्यांच्यावर ओढवू शकतात, सहन करावे लागू शकतात, त्रास देऊ शकतात अथवा ज्यांना सामोरे जावे लागू शकते, अशा नुकसानापासून वितरक आणि डिजिगोल्डला मुक्त करत आहात आणि पुढेही मुक्त ठेवाल.

25. हमींच्या अस्वीकरणाची सूचना

25.1.ह्या प्लॅटफॉर्मवर समाविष्ट असलेली किंवा अन्यथा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली सर्व माहिती, सामग्री, साहित्य आणि सेवा (एकत्रितपणे “सामग्री”) ह्या डिजिगोल्ड आणि वितरकाद्वारे “आहे त्या” आणि “उपलब्धतेनुसार” ह्या तत्वावर, कोणत्याही प्रकारच्या हमीच्या प्रतिनिधित्वाशिवाय, प्रदान करण्यात येत आहेत. डिजिगोल्ड आणि/किंवा वितरक प्लॅटफॉर्मच्या कार्याची अचूकता, सामग्रीची अचूकता किंवा संपूर्णता आणि माहितीची अचूकता ह्याबददल कोणत्याही प्रकारे, स्पष्टपणे अथवा अप्रत्यक्षरीत्या, कोणत्याही प्रकारचे प्रतिनिधित्व करत नाहीत अथवा हमी देत नाहीत. कोणतीही सामग्री, साहित्य, दस्तऐवज किंवा माहिती डाउनलोड केल्याच्या परिणामी तुमच्या संगणक प्रणालीला होणारे नुकसान किंवा डेटा नाहीसा होणे अथवा प्लॅटफॉर्मच्या वापरातून तुम्हाला होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस डिजिगोल्ड आणि/किंवा वितरक ह्यांची कोणतीही जबाबदारी असणार नाही. तुम्ही स्पष्टपणे सहमत होता की प्लॅटफॉर्मचा वापर हा तुमच्या एकट्याच्या जोखमीवर आहे. प्लॅटफॉर्म किंवा सेवा किंवा सामग्रीच्या वापरातून उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानाकरीता डिजिगोल्ड आणि/किंवा वितरक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, परिणामस्वरूप, दंडात्मक आणि परिणामस्वरुप नुकसान ह्यांच्यासह, कोणत्याही मर्यादेविना, अन्यथा लिखित स्वरुपात असल्याखेरीज, जबाबदार असणार नाहीत. डिजिगोल्ड आणि/किंवा वितरक हे प्लॅटफॉर्म (किंवा त्याचा कोणताही भाग) आणि त्यावरील स्पष्ट अथवा अप्रत्यक्ष, शीर्षकाची हमी, विक्रीयोग्यता आणि कोणत्या उद्देश अथवा वापराच्या योग्यतेसह, कोणत्याही मर्यादेविना, सर्व सामग्रीच्या कोणत्याही आणि सर्व प्रतिनिधित्वाचे आणि हमींचे, कायद्याने अनुमती असलेल्या संपूर्ण व्याप्तीपर्यंत, अस्वीकरण करत आहे.

26. दायित्वाच्या मर्यादा

तुम्ही ह्याद्वारे स्वीकारता की डिजिगोल्ड आणि/किंवा वितरक (त्यांचे संचालक, कर्मचारी, एजंट किंवा भागीदार यांच्यासह पण यांच्यापुरते मर्यादित न राहता) तुमच्याप्रती कोणत्याही विशेष, परिणामस्वरुप, प्रासंगिक आणि अनुकरणीय किंवा दंडात्मक नुकसानास, किंवा महसूलाच्या नुकसानास अथवा नफ्यास जबाबदार धरले जाणार नाहीत. डिजिगोल्ड आणि/किंवा वितरक प्लॅटफॉर्मवर प्रवेश न करता आल्यामुळे किंवा प्लॅटफॉर्मच्या कोणत्याही सेवांचा लाभ घेताना त्यावर प्रवेश करताना अ‍डचण आल्यामुळे, जे कोणत्याही तृतीय पक्षाकडून प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पसरवण्यात आले असतील असे कोणतेही बग्स, व्हायरस, ट्रॉयन हॉर्स किंवा तत्सम, तुमचा डेटा कोणत्याही प्रकारे नाहीसा होणे, तुमचा डेटा अथवा सेवामधील सामग्रीशी संबंधित कोणताही दावा आणि/किंवा ग्राहक खाते माहितीची सुरक्षित आणि गोपनीय राखण्यात तुमच्याकडून झालेला कसूर ह्यांच्यातून उद्भवणाऱ्या किंवा कोणत्याही प्रकारे संबंधित असणाऱ्या नुकसानासदेखील डिजिगोल्ड आणि/किंवा वितरक कोणत्याही परिस्थितीत जबाबदार असणार नाहीत. खेरीज, तुम्ही हेदेखील स्वीकारता की वितरक, कोणताही मध्यस्थ, किंवा प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यासाठी तुम्ही ज्याचे साधन वापरले अशी व्यक्ती आणि/किंवा गोल्ड खरेदी करण्यासाठी तुमच्याकडून पेमेंट्स स्वीकारण्याच्या/जमा करण्याच्या कामी वितरकाकडून नेमण्यात/नामित करण्यात आलेली व्यक्ती ह्यांच्यासह (पण ह्यांच्यापुरता मर्यादित नाही अशा) कोणत्याही व्यक्तीकडून झालेली कोणतीही आणि सर्व कृती किंवा कृती वगळणे ह्यासाठी तुम्ही डिजिगोल्डला कोणत्याही प्रकारे जबाबदार धरणार नाही. त्याचप्रमाणे, डिजिगोल्ड किंवा इतर मध्यस्थांच्या कोणत्याही आणि सर्व कृतींसाठी वितरकाला कोणत्याही प्रकारे जबाबदार धरता येणार नाही.

27. तक्रार निवारण यंत्रणा

27.1.माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 आणि त्या अंतर्गत केलेल्या नियमांप्रमाणे:

27.1.1.वितरकाच्या तक्रारींच्या उद्देशासाठी असलेल्या तक्रार निवारण अधिकारी ह्यांचे संपर्क तपशील आहेत:
नाव: तन्वी अरोरा
ई-मेल आयडी: terms@balancehero.com

27.1.2.डिजिगोल्डच्या तक्रारींच्या उद्देशासाठी असलेल्या तक्रार निवारण अधिकारी ह्यांचे संपर्क तपशील आहेत:
नाव: रुख्सार खान
ई-मेल आयडी: care@safegold.in
पत्ता: 1902 बी, पेनिनसुला बिझनेस पार्क, जी.के.मार्ग, लोअर परळ, मुंबई 400013

28. सुधारणा, अटींचा स्वीकार

28.1.हे नियम कोणत्याही वेळी बदलण्याचे, सुधारित करण्याचे, समाविष्ट भाग वाढवण्याचे अथवा कमी करण्याचे हक्क डिजिगोल्ड राखून ठेवते. असे बदल हे प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले जातील आणि असे बदल करण्यापूर्वी ग्राहकाला सूचित केले जातील. ह्याविरुद्ध काहीही असले तरी, प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आलेल्या बदलांसह नियमांचे नियमितपणे पुनरावलोकन करण्यास ग्राहक जबाबदार असेल आणि त्याने प्लॅटफॉर्मचा वापर चालू ठेवल्यास त्याने बदलण्यात आलेले नियम स्वीकारले आहेत असे समजण्यात येईल.

28.2.प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळवणे, ब्राउझ करने किंवा अन्यथा प्लॅटफॉर्म वापरणे हे सूचित करते की तुम्ही ह्या नियमांतर्गत असलेल्या सर्व नियम आणि अटींशी सहमत आहात. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही नियम काळजीपूर्वक वाचून घ्यावेत असा सल्ला प्रकर्षाने देण्यात येतो. हे नियम अप्रत्यक्षपने अथवा प्रत्यक्षपणे स्वीकारून तुम्ही वितरक आणि/किंवा डिजिगोल्डने वेळोवेळी सुधारलेल्या गोपनीयता धोरणासह (“गोपनीयता धोरण”) पण त्यापुरता मर्यादित न राहता सर्व धोरणे स्वीकारता आणि त्यांस बांधील राहण्यासाठी सहमत होता. तुम्ही वितरकाचे गोपनीयता धोरण प्लॅटफॉर्मवर आणि डिजिगोल्डचे गोपनीयता धोरण www.safegold.com वर पाहू आणि वाचू शकता.

28.3.जर तुम्ही हे नियम स्वीकारले नाहीत किंवा ह्या नियमांना बांधील राहण्यास असमर्थ आहात तर तुम्ही प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही अथवा तिथल्या सेवांचा वापर करता येणार नाही. प्लॅटफॉर्मवरील तुमचा प्रवेश आणि त्याचा वापर किंवा तुमच्याद्वारे प्लॅटफॉर्मचा वापर करून कोणत्याही सेवांचा उपयोग ह्यासाठी एक अट म्हणून तुम्ही प्लॅटफॉर्मचा वापर करत असताना सर्व लागू कायदे व नियमनांचे अनुपालन कराल यांस तुम्ही सहमत होता. तुम्ही ग्राहक खात्याचा वापर कोणत्याही बेकायदेशीर कार्याकरीता करत आहात असे डिजिगोल्डचे मत झाले तर तुम्हाला प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सेवा वापरण्यापासून ब्लॅकलिस्ट करणे किंवा रोखणे अथवा अशा बेकायदेशीर कृत्यांशी संबंधित प्राधिकरणाला सदर बाब कळवणे यांसह सर्व उपलब्ध कारवाई करण्याचे हक्क डिजिगोल्डला असतील.

bottom of page